काँग्रेस पक्षाच्या कोव्हिड मदत सहाय्य केंद्राचा रूग्णांसह नातेवाईकांना मिळाला ‘आधार’

0

जालना (प्रतिनिधी) ः कोरोना महामारीमध्ये महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार संपुर्ण राज्यामध्ये कोव्हिड मदत व सहाय्यक केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्राच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध पैलूवर सक्रीयपणे काम केल्यामुळे रूग्णांसह रूग्णांच्या नातेवाईकांना मोठा आधार देण्याचे काम झाले आहे.
जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मदत व सहाय्यक केंद्र सुरू होवून एक महिण्याचा कालावधी लोटला आहे. आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली केंद्र प्रमुख म्हणून केंद्र प्रमुख म्हणून शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद आणि डॉ. विशाल धानुरे, चंद्रकांत रत्नपारखे, मोहन इंगळे, गणेश चौधरी, फकीरा वाघ, जावेद अली या पदाधिकाऱ्यांचा कमिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
कोरोना महामारीच्या कठिण काळात केंद्रामार्फत रक्तदान शिबीर, जनजागृती, रूग्णांना समुपदेशन रूग्णा वाहिकेची उलब्धता, बेडची उलब्धता, रेमडेसिवीर इंजक्शनची उपलब्धता आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात केंद्राकडून शेकडो लोकांना मदतीचा हात पुढे करण्यात आला. त्याच बरोबर मास्क, सॅनिटायझर व तसेच अन्न पाकीट वाटपाचे काम देखील केंद्राच्या माध्यमातून करण्यात आले. डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शनानूसार कोव्हिड रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अचूक माहिती देण्यात येत आहे. काँग्रेस कोव्हिड मदत व सहाय्य केंद्राला जिल्हा सामान्य रूग्णालय आणि शहरातील खाजगी रूग्णालयांनी वेळोवेळी माहिती देऊन मोलाची मदत करीत आहेत.
आ. कैलास गोरंट्याल यांच्याकडून कोव्हिड रूग्णालयासाठी एक कोटी रूपये
आ. कैलास गोरंट्याल यांनी कोरोना महामारीचे गांभीर्य ओळखून जिल्ह्यातील जनतेसाठी आपल्या आमदार निधीतून एक कोटी रूपयाचा निधी प्रदान केल्यामुळे कोव्हिड रूग्णालय (अग्रेसन फाऊंडेशन) येथे स्थापीत करण्यास मोठी मदत झाली आहे. कोव्हिड रूग्णांच्या नातेवाईकांची  निवाऱ्याची सोय नसल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालय येथे निवारा केंद्र उघडून श्री गोरंट्याल यांनी मदतीचा हात पुढे केला. याठिकाणी आलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना सकाळचा नाष्टा आणि जेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी संजय भगत, सागर ढक्का, गोपाल चित्राल, योगेश पाटील, सय्यद रहिम तांबोळी यांनी निवारा केंद्रात सेवा देण्यासाठी परिश्रम घेतले.
जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली कोरोना महामारीच्या काळात काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या कोव्हिड मदत सहाय्य केंद्रामुळे रूग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय दुर झाली आहे. शहरातील मंठा रोडवर कोरोना बाधीत मृत्तकांवर अत्यंसंस्कार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या मुक्तीधाम स्मशानभूमीत लाकडांची कमतरता भासत असल्यामुळे आ. कैलास गोरंट्याल यांनी स्वतःहून पुढाकार घेत सर्वप्रथम वीस टन लाकूड उपलब्ध करून दिले. आणि शहरातील व्यापारी व उद्योजकांना लाकूड उपलब्ध करून देण्याचे आवाहन केल्यानंतर आ. गोरंट्याल यांच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक व्यापारी, उद्योजक आणि सामाजीक संघटनांचे पदाधिकारी मदतीसाठी धावून आले. 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.