सोयाबीन पिकांमध्ये बीज प्रक्रिया महत्त्वाची-बाळासाहेब शिंदे

0

जालना:खरीपाची पेरणी तोंडावर आली असून सोयाबीन पिकांसोबतच इतर पिकांच्याही बीजप्रक्रियेला महत्व द्यावे असे मत आत्माचे प्रकल्प संचालक श्री बाळासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले दि 25 मे रोजी जालना जिल्ह्यात विना अनुदानित तत्वावर बीजप्रक्रिया मोहीम पार पडली ही मोहीम 916 गावामध्ये पार पडली असून 1985 प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत तर 15023 शेतकऱ्यांना या मोहिमेचा लाभ भेटला आहे, सोयाबीन 3577.80 तूर 705.35 मूग 534.47,मका 5.60 तर उडीद 85.27 अशी एकूण 4908.49 क्विंटल बियाण्यावर शेतकऱ्यांनी पेरणी पूर्वी बीजप्रक्रिया करून घेतली आहे , सोयाबीन किंवा इतर पिकांच्या पेरणीला फारसे महत्व दिले जात नाही बीज प्रक्रिया ही जरी क्षुल्लक बाब असली तरी त्यापासून मोठा फायदा शेतकऱ्यांना होउ शकतो ,भविष्यात येणाऱ्या कीड व रोगांवर नियंत्रण आणण्यास बीज प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे घरचे सोयाबिन चे बियाणे असल्यास बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी ,यामुळे बुरशीवर मात करता येते
बिजप्रक्रियेचे फायदे
जमिनीतून व बियाण्यांव्दारे पसरणार्‍या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.
बियाण्यांची उगवण क्षमता वाढते.
रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात.
पिकाच्या उत्पादनात वाढ होते. बिजप्रक्रियेसाठी कमी खर्च येतो, त्यामुळे ही कीड/रोग नियंत्रणाची किफायतशीर पध्दत आहे.
रासायनिक बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करणे
बुरशीनाशकाची प्रक्रिया शिफारशीनुसार करावी. अशी प्रक्रिया करताना, साधारणत: 3 ग्रॅम थायरम किंवा कार्बेन्डेन्झीम ३ ते ४ ग्राम प्रतिकिलो बियाण्यास घेऊन चोळावे. थायरम लावत असतांना अंगाला खाज सुटणे व डोळे लाल होणे यासारखे लक्षणे दिसु लागतात ती टाळण्यासाठी अशी प्रक्रिया करतांना हातामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे वापरावे.
बिजप्रक्रिया करण्याचा क्रम:
सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करावी. त्यानंतर 3-4 तासांनी रायझोबिअम बिजप्रक्रिया करावी, सर्वात शेवटी पी. एस.बी. ची बिजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकांची बीजप्रक्रिया करूनच शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी करावी असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक श्री बाळासाहेब शिंदे यांनी केले

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.