सुनिता जाधव यांचा खोतकर यांच्या हस्ते कोरोना योध्दा म्हणून गौरव

0

जालना : कोरोनाने देशभरात थैमान घाले आहे. या कोरोनामुळे अनेकजन निगेटीव्ह भुमीका घेऊन जगत आहेत. भिती आणि दडपणाखाली अनेकजन दिवस काढत आहेत. कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्या रुग्णांच्या जवळ जाणे तर सोडाच साधे रुग्णांच्या परिवाराला बोलायलाही घाबरतात परंतु जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कक्ष सेविका म्हणून काम करणार्‍या सुनिता अरुण जाधव या सर्वांसाठी आदर्श ठरल्या आहेत. त्या स्वतः निगेटीव्ह असतांनाही विचाराने पॉझिटीव्ह असल्यामुळे कोरोना रुग्णांच्या वार्डातील स्वच्छतेसह असहाय्य रुग्णांना प्रेमाने घास भरवून त्यांची मनोभावे सेवा करीत आहेत. अत्यंत सिरीयस असलेल्या एका वृध्द महिला रुग्णास स्ट्रेचर न मिळाल्याने सुनिताने स्वतः हातावर पेशंट घेऊन आयसीयुमधे नेऊन सोडले. त्या पेशंटची जेवणापासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत सर्व काळजी घेतली. आज ते पेशंट ठण-ठणीत बरे होऊन सुट्टी घेऊन आपल्या घरी गेले आहे. अशा अनेक कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे मनोबल वाढवून त्यांना हिंम्मत देणार्‍या सुनिता जाधव यांचा माजी राज्यमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री. अर्जुनराव खोतकर व जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी कोरोना योध्दा म्हणून नुकताच गौरव केला आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.