लॉकडाऊन काळात करण्यात आलेले अतिक्रमण तात्काळ काढून टाका !महामाया सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रेम जाधव यांची मागणी

0

जालना : लॉकडाऊनच्या काळात बाहुबलींनी केलेले अतिक्रमण तातडीने काढून टाकावे, अशी मागणी महामाया सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रेम जाधव यांनी केली आहे. या संदर्भात मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात श्री. जाधव यांनी म्हटले आहे की, शहरातील मुक्तीधाम स्मशानभुमी शेजारी गांधीनगर, अंबड रोड, मंठा चौफुली परिसर,काळे चौक, जवाहरबाग परिसर, संभाजीनगर, नवीन मोढा रोड, मोतीबाग परिसर, दविस, कन्हैवानगर चौफूली परिसर, कंडलिका, सीना नदीच्या दोन्ही बाजू, एमएसईबी परिसर मस्तगड आटी भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. वा अतिक्रमणावर काही ठिकाणी पक्के बांधकाम करुन मोठे हॉटेलसह इतर व्यवसाव सुरू केले आहेत. अतिक्रमण करणारी सर्व मंडळी बाहूबली असल्वाने नंतरच्या काळात शेजारी असलेल्या गोरगरीबांचे घरेही हे सर्व उद्धवस्त करू शकतात. त्यामुळे कोरोना काळात करण्यात आलेले अतिक्रमण पूर्णपणे काढून टाकण्यात यावे, तसेच त्यांच्यावर कावदेशीर कारवाई करण्यात वावी, अशी मागणी महामाया सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यात शहरासह जिल्ह्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात हे सर्व अतिक्रमण करण्यात आले आहे. या लोकांना राजकीय पाठबळ आहे की, नगर पालिकेचे स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी यांचे वा अतिक्रमणात संगनमत तर नाही ना, याचीही पूर्णपणे चौकशी करण्यात यावी. सदरील परिसरातील अतिक्रमण तत्काळ न हटविण्यात आल्यास महामावा सामाजिक संघटनेच्यावतीने आपल्या नगर पालिकेच्या समोर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश जाधव, युवा जिल्हाध्यक्ष अमजद शेख अहेमद शेख, जिल्हाध्यक्ष सुनील लाखे, शहराध्यक्ष गजानन रायपुर मराठवाडा युवक अध्यक्ष राज वाकळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.