यंग जायंट्स व शांती दुत परिवार यांच्या प्रयत्नातून सुपर 40 ब्लड डोनर ग्रुप ने केले रक्तदान

0

जालना (प्रतिनिधी) ः मागील महिन्यात नाना चुडासमा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी जालना शहरातील 70 जणांनी रक्तदान केले होते . याच वेळेस माजी पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव ,अण्णा देशपांडे व ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत यांच्या मार्गदर्शनातून 40 सुपर डोनर ग्रुप तयार करण्यात आला होता.   सर्व रक्त दात्यांच्या मदतीने किमान 10 बॉटल्स रक्त जन कल्याण रक्त पेढीला दर महिन्याला पुरवण्यात येणार आहे.
            स्वराज्य राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने 40 रक्त दात्यानी रक्तदान केले. याप्रसंगी यंग जायंट्स जालना ग्रुपचे अध्यक्ष बॉबी अग्रवाल, व शांती दुत परिवाराचे अध्यक्ष गणेश लुटे, यंग जायंट्स उपाध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, उपाध्यक्ष अक्षय धोंगडे जैन,सचिव शुभम गाढवे, मानसी बाफना, चिराग बाफना, सलोनी बोरा, पौरवी देशपांडे, निलिशा गोयल, ऋतुजा भंडारी खजिनदार, कस्तुरी धन्नावत, शुभम कौडगावकर जन संपर्क अधिकारी, अमर पवार, धनंजय दिक्कर, प्रसाद राजपूत, गणेश चाळगे, गणेश काळे, माधुरी जोशी, आकाश गेही, अमित भारुका, अंकित अग्रवाल, ॲड. शुभम भारुका, अजय मिश्रा, पीयूष जैस्वाल, रुपेश घुसलकर, सुबोध देशमुख, डॉक्टर नेहा जैन, कृष्णा कासार, संतोष लुटे, साक्षी गेहि, अ‍ॅड. चंद्रशेखर राठोड, ज्योत्स्ना भंडारी, रामेश्वर पवार, पूजा ससाणे, मनीष बोरा, सुमित संचेती व इतर सर्व सदस्य उपलब्ध होते.
रक्त दाना मुळे रुग्णाचे प्राण वाचण्याची संधी आपल्याला मिळते. कोरोनाच्या काळात रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्यामुळे विवध आजारांना सामोरे जाणाऱ्या रुग्णांना मोठी समस्या निर्माण झाली आहे तरी ज्यांना शक्य होते त्यांनी या उपक्रमात जरूर सहभागी व्हावे असे आवाहान यंग जायंट ग्रुपचे अध्यक्ष बॉबी अग्रवाल यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत साहनी उपस्थित होते व त्यांनी शुभेच्छा दिले.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.