मला समजलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर

0

कोणतीही एखादी मोठी व्यक्ती सार्वजनिक जीवनात कोणत्याही कारणाने आपल्यातून निघून गेली तरही त्या व्यक्तींचे विचार आणि मनातील आठवणी या कायम राहतात. आत्मा अमर आहे असे आपण नेहमी वारंवार ऐकत असतो अगदी तसेच मला वाटते आपल्या समाजात ज्या ज्या व्यक्तींनी ‘भीम’ पराक्रम केले त्या त्या व्यक्तींचे विचार आजही कायम आहेत.या व्यक्ती ची थोडक्यात ओळख सांगायचीच झाल्यास ती अशी प्रख्यात विद्याविभूषित, पराक्रमी, प्रेरणादायी,जिद्दी,मुत्सद्दी,प्रगल्भ बुद्धिमान, चारित्र्य संपन्न, प्रयत्नवादी, जगविख्यात, अतिशय प्रेमळ, संभाषण चतुर, मानवतावादी, विज्ञानवादी,निर्भीड पत्रकार, उत्तम लेखक, कृषितज्ञ,स्त्रियांचे कैवारी, दिन दलितांचे कैवारी, शोषितांचे कैवारी,उत्तम सत्याग्रही, उत्तम आंदोलक, स्वच्छ राजकारणी,कायदेपंडित, आधुनिक मनू, भारताच्या अस्मितेच्या मानाचा मानबिंदू, महामानव, बोधिसत्व, भारताच्या इतिहासातील मनाचा तुरा, आणि भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजेच डॉ. भीमराव रामजी आंबेडकर.
ही या महामानवाची ओळख आहे.
भारताच्या पावन भूमीवर अनेकानेक थोर महापुरुषांनी जन्म घेऊन या पावन भूमीत देशासाठी आणि देशातील समाजासाठी कार्य केले. आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून सामाजिक बांधिलकी व राजनिष्ठा जोपासून विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवला. त्यांच्या या अश्या कार्याचा वसा आणि वारसा आपल्या देशवासियांसाठी एक दीपस्तंभ म्हणून आजही उपयोगी ठरत आहे.देशातील महापुरुषांच्या यादी मध्ये अग्रगण्य स्थान असलेली एकमेव व्यक्ती ती डॉ बाबासाहेब आंबेडकर दिनांक १४ एप्रिल ही तारीख भारताच्या इतिहासात एका मोठ्या शिल्पावर सुवर्ण अक्षरांनी कोरल्या जावी अशी ही तारीख आहे आणि माझ्यामते खऱ्या अर्थाने या तारखेला महत्व मिळाले ते बाबासाहेब आंबेडकरांमुळे कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी १५ एप्रिल ही तारीख आहे परंतु त्या तारखेस विशेष असे काहीही महत्व नाही महणजे इथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे व्यक्तीचे कर्तृत्व हे आपल्याला महत्व प्राप्त करू देते. अष्टपैलू सर्वगुणसंपन्न असे त्यांचे व्यक्तिमत्त्व त्याकाळी अस्पृश्य म्हणून गणल्या जाणाऱ्या महार जातीत त्यांनी जन्म घेतला त्यांच्या बालपणापासूनच समाजावर होणारे अन्याय अत्याचार या सर्व गोष्टींचा त्यांच्या बालमनावर मोठ्याप्रमाणात आघात झाला होता स्वतः त्यांनी दलित सवर्ण हा वाद जवळून त्यांनी अनुभवला आणि याच परिस्थितीतुन त्यांनी प्रेरणा घेतली आणि अश्या खडतर परिस्थिती त्यांनी त्याकाळी अस्पृश्य समाजातील पाहिले शालांत परीक्षा १९०७ साली उत्तीर्ण झाले (SSC) यातून त्यांची जिज्ञासू भाव दिसून येतो. दलित सवर्ण अश्या या काळातही त्यांनी आपल्या शिक्षणाच्या जोरावर भीम पराक्रम केला. १९०७ सालीचा त्यांनी आपल्या शाळांत परीक्षेच्या निकालातून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्यातील हीच शिकण्याची जिद्द पाहून त्यांच्या मदतीला अनेकानेक मदतीचे हात समोर आले कोल्हापूर चे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना त्यांच्या विविध प्रकारच्या कार्यात सहभागी होऊन वेळोवेळी मदत केली. अस्पृश्य म्हणून हिणवले जाणाऱ्या जातीतील एक तरुण आज उमेदीने भरारी घेत आहे त्या तरुणांच्या पंखांना बळ देण्याचे कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केले. आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत नंतरच्या काळात त्यांनी विविध वर्तमानपत्र नियतकालिके काढली त्यासाठी छापखाण्यासाठी त्यांनी बाबासाहेबांना मदत केली होती. त्यांच्यातील जिद्द चिकाटी वृत्तीने त्यांना अनेक मदतीचे हात उभे राहिले आणि ते नेहमी त्यांच्या भाषणात वारंवार म्हणत देव आहे की नाही मला माहिती नाही परंतु कर तुम्ही कार्य प्राप्तीसाठी तत्पर असाल तेव्हा नक्की तुम्हला देव मदत करेल म्हणजेच अगोदर तुम्ही आपणहून काही कराल तरच त्या व्यक्तीला देव मदत करतो.
हेच विवेकानंदांच्या शब्दत कथन करायचे झाल्यास “युवकांनो झेप घ्या दिशा तुम्हास शरण येतील” अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर बाबासाहेबांनी या विदेशातील एक नाही तब्बल ३२ विद्यापीठाच्या पदव्या मिळवल्या ते शिक्षणाच्या जोरावर. त्यांच्या घरात कुठलीही पार्श्वभूमी नसतांना ही त्यांनी विदेशातून आपल्या शिक्षणाचा प्रवास सुरु ठेवला त्यांच्यातील जिद्द ही खूप पाहू शिकवून जाते बाबासाहेब नेहमी म्हणत शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी अस्त्र आहे त्याच्या त्याच अस्त्राच्या जोरावर त्यांनी इतिहास घडवला आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिला तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
माझ्यामते विद्वत्तेचा खरा महामेरू असेल तो म्हणजे बाबासाहेब कारण ही तसेच आहे लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी DSC पदवी मिळवणारे एकमेव भारतीय हा देखील विक्रम त्यांच्या नावे आहे. अतिशय प्रेरणादायी बाबासाहेबांना जो जो बहुमान मिळाला तो केवळ शिक्षणाच्या जोरावर ते त्यांच्या व्याख्याना मध्ये नेहमी म्हणत तुमच्या कडे २ नाणे असतील तर एका नाण्याचे पुस्तक घ्या आणि एका नाण्याची भाकरी घ्या. भाकरी तुम्हला जगवेल आणि पुस्तक तुम्हला जगण्याची कला शिकवेल.

एक व्यक्ती आपल्या बुद्धिमत्तेच्या जीरावर विविध क्षेत्रात आपला नावलौकिक मिळवू शकतो हे त्यांनी सर्व जनतेला दाखवून दिलं आहे तरुणांनी तर त्यांचे कडे एक शिक्षक व दीपस्तंभ म्हणून च आदर्श मानावा जे बाबासाहेब अर्थतज्ञ होतात तर तेच बाबासाहेब उत्तम आणि स्वच्छ राजकारणी होऊ शकतात. बुद्धी तर देव सर्वांचा देतो परंतु त्या बुद्धीचा वापर कोण काश्याप्रकारे करतो याला महत्व प्राप्त होते ते महत्व आज बाबासाहेब आंबेडकरांना प्राप्त झाले आहे.. बाबासाहेबांच्या आयुष्यात शिक्षण हे सर्वोच्च स्थान होते ते नेहमी म्हणत My Education Is My Society माझं शिक्षण हे माझ्यासाठी नव्हे तर माझ्या समाजासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे माझ्या मते त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग स्वत: साठी केला असता तर आज ते जगातील धनाढ्य लोकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असते त्यांच्यातील उदराता आणि समजाबद्दची आत्मीयता दिसून येते.
त्यांनी त्यांच्या आयुष्यात नेहमी जिथे जिथे भाषणातून एकमेव मूलमंत्र दिला तो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. परंतु आज शिक्षण घेणे तर दूरच, संघटित होणेही दूरच बस आज संघर्ष हा होतोय की बाबासाहेबांनी आमच्या जातीसाठी काय केलं ? बाबासाहेब आमचे की तुमचेच खरं तर बाबासाहेब हे सर्वांचे आहेत हे आजही लोकांना कळलं नाहीये हे फार मोठं दुर्दैव आहे बाबासाहेबांनी काम करताना एक समाज म्हणून आपले कार्य सदैव तत्पर सुरू ठेवले त्यांनी जात हा प्रकार मानलाच नव्हता जाती जाती मधील उच्च नीच दलित सवर्ण असल्या प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली शेतकरी वर्ग महिला वर्ग गिरणी कामगारांच्या विविध समस्या असतील त्या समस्यांवर त्यांनी कायदेशीर रित्या प्रघात केला आणि त्या समस्या सोडवून दिल्या आता या मध्येच उत्तर दडलेले आहे त्यांनी आपला लढा एक वर्ग म्हणून लढवला शेतकरी वर्ग असेल मग कामगार वर्ग असेल महिला वर्ग असेल आता यामध्ये विविध अठरा प्रगट जातींचा समावेश होता जर जात म्हणून च बाबासाहेबांनी आपले कार्य केले असते तर त्यांनी भारतीय हिंदु कोड बील संसदेत मंजूर न झाल्याने त्यांनी आपल्या केंद्रीय कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला नसता? हिंदू धर्मातील स्त्रियांच्या अत्याराच्या बाबतीत ही त्यानं वाटत असल्याने त्यांनी चक्क मंत्रीपद लाथ मारून दिली ते आज कुठल्या ही पक्षाच्या नेत्याने केलं असत का? म्हणून भारताच्या इतिहासातील एक स्वच्छ राजकिय पुढारी म्हणून त्यांचे नाव अगत्याने मला नेहमी घ्यावेसे वाटते. ज्या ज्या ठिकाणी विषमता त्या त्या ठिकाणी लढण्याची प्रेरणा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर.बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्ती नसून एक सर्वात मोठी व्याप्ती आहे असे मी म्हणतो त्यांनी देशाच्या आर्थिक राजकीय कायदे निर्मिती साठी अमूल्य असे योगदान दिले आहे देशाच्या रिझर्व बँक स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता देशाच्या आर्थिक बाबतीत त्यांचे एवढे मोठे योगदान असेल तर त्यांना कुठल्या एका जाती पर्यंत मर्यादित करून आपणच त्यांची अवहेलना तर करून आणि त्यानं एका जातीत समाविष्ट करून अजून लहान करण्याचा एक प्रकारे प्रयत्न करतोय.
समाजातील शोषित पीडितांना शिकवून बाबासाहेब एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी पुन्हा राजकारणात ही दलितांचा सहभाग असावा कायदेमंडळात ही माझा दलित बांधव असावं या हेतूने त्यांनी पक्ष देखील स्थापन केला त्यांनी कित्येक दलित तरुणांना लोकप्रतिनिधी करून त्यांना स्वच्छ राजकारणात प्रवेश करून दिला.
आज आपण महिला सक्षमीकरण महिला सशक्तीकरण अश्या संकल्पना निवडणुका जवळ आल्या की फार ऐकतो या संकल्पनेची मुहूर्तमेढ सुद्धा त्याच काळी बाबासाहेबांनी करून दिली आहे. अर्थात बाबासाहेब थोर अर्थतज्ञ असल्या कारणाने आज जी आपल्या देशात बेरोजगारी बेकरी ची अवस्था निर्माण झाली आहे त्यावर ही त्यांनी अगोदरच भाकीत केले की विद्यापीठातुन जेवढे विद्यार्थी दरवर्षी पास होतात तेवढ्याच प्रमाणात त्यांना रोजगाराच्या जागा निर्माण केलेल्या असाव्यात पण आजची परिस्थिती अतिशय गंभीर झाली विद्यापीठ म्हणजे बेरोजगार निर्मिती चा कारखाना अशी झाली आहे बाबासाहेब चे हेच मत तेव्हापासून आजपर्यंत अंगीकारले असते तर आज बेरोजगारी चे प्रमाण कमी झाले असते.
म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्ती नसून एक व्याप्ती आहे हे या त्यांच्या कार्यातून दिसून येतेच ते उत्तम नियोजनकार च होते कारण घटना निर्मितीसाठी त्यांचे योगदान अतिशय उच्च आहे ते एक दूरदृष्टीचें नेते होते घटनेत कालांतराने बदल हा गरज आहे म्हणून त्यांनी घटनेत तशी तरतुद ही केली आहे कलम (३६८).

घटना निर्मितीत त्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
घेतनेत त्यांनी देशातील सर्व १८ प्रगत जातींचा विचार करून तब्बल ४ वर्षाच्या मेहनती नंतर देशाला घटना दिली, देशाच्या सिंचन क्षेत्रात ही अमूल्य योगदान दिले.
बाबासाहेब आंबेडकरांना जेंव्हा जेंव्हा वाचत असतो तेव्हा तेव्हा एक मात्र नक्कीच वाटतं त्यांचे नाव उगाचच भीमराव नव्हते एक भीम पराक्रमी योद्धा होते.
सुरेश भट यांच्या कवितेतील एक काव्य पंक्ती.
कालचे सारे मुके,आज बोलू लागले। अन तुझ्या सत्यासवे,शब्द तोलू लागले घे वसंता,घे मनाच्या मोहरींची वंदना. भीमराय घे तुझ्या लेकरांची वंदना… https://www.instagram.com/shashankkul93?r=nametag

- Advertisement -

महामानवास १२९ व्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन आणि सर्वाना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती च्या हार्दिक शुभेच्छा…
धन्यवाद.

शशांक सुरेशराव कुलकर्णी (जालना)
संंपर्क Instagram Id :- Shashankul93

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.