मनसे तर्फे जालना शहरात राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

0

 जालना ( प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस सोमवारी ( ता. १४) जालना शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. 
   मनसेचे शहर प्रमुख राहुल रत्नपारखे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व मनसे सैनिकांनी विविध उपक्रम राबविले. यावेळी  संजय राजगिरे, शरद पाटील मांगधरे, अमोल जाधव, पंकज घोगरे, अजय मोरे, अविनाश ढोलके, आकाश जाधव, बालाजी तिडके, किरण जाधव, आदित्य कसबे, नितेश नेमाडे, मनोज पाचगे , अमोल मिसाळ, ललित कुचेकर यांची उपस्थिती होती .  जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून  कोवीड योध्दे असलेल्या  डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.तसेच मास्क व सॅनि टायजर चे वाटप करण्यात आले. शहरात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली.  गो शाळेत गाईंना चारा, पाणी वाटप , जालना शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यास प्रारंभ झाला. असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी  पदाधिकारी व मनसे सैनिकांची  उपस्थिती होती. 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.