पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात केंद्र सरकार विरूध्द काँग्रेस पक्षाचे जोरदार निदर्शने

0

जालना (प्रतिनिधी) ः केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल – डिझेल आणि गॅसच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ केल्यामुळे सामान्य जनतेचे जगणे कठिण बनले आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेचा निषेध व्यक्त करून जालना शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण राज्यामध्ये इंधन दर वाढिच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सोमवार रोजी जालना शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अंबड रोड येथील जांगडे पेट्रोल पंपावर निदर्शने करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोलचे दर शंभरीवर पार केले आहे तर डिझेलचे दर 92 रूपये झालेले आहे. स्वयंपाक गॅसचे दर देखील गगनाला भिडले आहे. इंधन दर वाढल्यामुळे याचा वाहतुकीवर परिणाम होवून जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे शेतकरी कष्टकरी आणि सामान्य माणसाला जगने कठिण झाले आहे. एकुण केंद्र सरकारच्या आडमुठ धोरणामुळे महागाई वाढली आहे. केंद्र शासनाच्या या चुकीच्या धोरणाचा काँग्रेस पक्षाकडून तीव्र निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने इंधन दरवाढिचे भाव ताबडतोब मागे घ्यावे अशी मागणी करत सोमवार रोजी तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी अ.भा.कॉ.चे सदस्य भिमराव डोंगरे, जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, प्रा. सत्संग मुंढे, विजय कामड, तालुकाध्यक्ष वसंत जाधव यांनी आपल्या भाषणातून केंद्रातील भाजप सरकारचा तीव्र निषेध करीत केंद्र सरकार हे जनसामान्यांच्या विरोधात असून धनदांडग्यांच्या पाठीमागे उभे राहात असल्यामुळे देशातील शेतकरी आणि सुशिक्षीत बेकार सैरभैर झाला आहे. केंद्र सरकारने इंधन दर ताबडतोब मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी गटनेते गणेश राऊत, नगरसेवक अरूण मगरे, चंद्रकांत रत्नपारखे, अशोक उबाळे, राजेंद्र गोरे, शेख शमशु, नारायण वाढेकर, राजेश काळे, धर्मा खिल्लारे, दत्ता शिंदे, फकीरा वाघ, राजु पवार, मनोहर उघडे, अरूण घडलिंग, नदीम पहेलवान, कृष्णा पडूळ, विठ्ठलराव डोंगरे, रामजी शेजुळ, नंदाताई पवार, अनस चाऊस आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.