टिकारिया म्युझिकचे सादरीकरणबचपत से पचपन कार्यक्रमाचे प्रेक्षकांची मने जिंकली!

0

जालना,दि.१५ (प्रतिनिधी) –  येथील टिकारिया म्युझिकतर्फे टीएम म्युझिक कॉन्सर्ट बचपन से पचपन हा अभिनव कार्यक्रम नुकताच जालन्यात पार पडला. या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली.  जालना शहरातील एकुण २४ अबालवृध्द गायक कलावंतांनी आपल्या गितांव्दारे प्रेषकांना अनेकवेळ खिळवून ठेवत टाळ्या देखील मिळवल्या.  कार्यक्रमाची सुरुवात सनत भक्कड या बाल गायकाच्या एन दिन बिकजायेंगा माटि के मोल, या गीताने करण्यात आली. तुफान टाळ्यांच्या गडगडात प्रेक्षकांनी पहिल्याच गीतापासून कार्यक्रमात रंगत आणली. त्यानंतर अंजली निलम, प्रांजल बांगड, दिव्याशू क्षिरसागर, श्रीशा गोरंट्याल, अक्षया नानावटी, वैष्णवी या बाल कुमारांनी आपल्या भारदस्त आणि पहाडी आवाजात सादर केेलेल्या गितांवर  प्रेक्षकांनाही ठेका धरायला भाग पाडले.  रात अकेली है, या अवघड परंतू विचार करायला भाग पाडणार्‍या गाण्यासह देखाना हायरे सोचाना… या गाण्यातील मॉडलिंग तर ये इश्क हाये… या गीतातील भाव आणि तीन गाण्याचं एकत्रितकरण अत्यंत खुबीने करण्यात आलं होतं. तर डॉ. आरती मंत्री, सीया बजाज, संगीता श्रोत्रीय, राजेश्री व्यवहारे, सीता नानावटी यांनीही आपल्या सुमधुर आवाजातील गिते सादर करुन प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टिकारिया म्युझिकच्या टीमने परिश्रम घेतले.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.