जे ई एस महाविद्यालयात विधापिठीय आंतर महाविधालयीन बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन

0

जालना,प्रतिनिधी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व जे ई एस महाविद्यालय  जालना यांच्या संयुक्त विध्यमाने आंतर महाविद्यालयीन क्रीडा महोत्सवा निमित्त बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून स्पर्धेचे उद्घाटन महिला राष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू कुमारी शयान पठाण  हिच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शिवनारायण बजाज हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद चे बोर्ड ऑफ स्पोर्ट्स चे सदस्य व बॉक्सिंग स्पर्धा पंच डॉ. संदीप जगताप व जे ई एस महाविद्यालयाचे माजी क्रीडा विभाग प्रमुख प्रा. राम श्रीमाळी हे होते. व्यासपीठावर बॉक्सिंग खेळाचे पंच श्री, लक्ष्‍मण कोळी, प्रा प्रवीण कोल्हे, प्रा ज्ञानेश्वर वाघ, आशिष वानखेडे, प्रा टाईम कीपर मयूर खंडागळे, जालना चे पंच सचिन आर्य,फईम खान, मयूर पिवळं हे उपस्थित होते .  कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख प्रा डॉ. हेमंत वर्मा यांनी केले. त्यांनी स्पर्धेचे आयोजन मागील ची भूमिका सांगून जालना जिल्ह्यात बॉक्सिंग खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी आयोजन केल्याचे सांगितले. विशेष म्हणजे जिल्हात पाहिलांदाच अशी स्पर्धा आयोजन करणाचे मान आमचे महाविद्याला लाभले असे संगितले. अध्यक्षपदावरून बोलताना डॉक्टर शिवनारायण बजाज म्हणाले की बॉक्सिंग खेळामुळे आरोग्य सुदृढ राहते खेळाडूंमध्ये आक्रमकता यांची निर्मिती होते यामुळे देश भक्ती वाढीस लागते असेही डॉक्टर बजाज म्हणाले.यावेळी मुलींच्या स्पर्धा घेण्यात आली व  खेळातील प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या सुवर्ण व सिल्वर मेडल पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. राजेंद्र सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. बाबासाहेब वाघ यांनी मानले प्रा. डॉ. किशोर बिरकायलू, प्रा. वासरे, प्रा. सारस्वत, प्रा डॉ. पगारे, डॉ. तनपुरे, डॉ आंधळे तसेच सेवक श्री रमेश जाधव व रॉबर्ट कांबळे, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.