जालना शहरातील महात्मा फुले मार्केटची जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी

0

           जालना- शहराच्या मध्यभागी व मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या महात्मा फुले मार्केटची ईमारत अत्यंत जीर्ण झाली असुन या मार्केटच्या पुर्नबांधणीच्या प्रस्तावाबाबत राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक संपन्न झाली होती. त्या धर्तीवर जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी प्रत्यक्ष भेट देत पहाणी केली. 

- Advertisement -

            सन 1980 ते 82 दरम्यान ही वास्तु उभारण्यात आली असुन ती आजघडीला अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे.  या वास्तुची पुर्नबांधणी केल्यास नगरपरिषदेच्या मालकीची सुसज्ज अशी वास्तु तयार होणार असुन या माध्यमातुन 300 ते 350 छोट्या व्यावसायिकांना जागा उलब्ध होणार आहे.  याठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंग सुविधा करण्याचाही प्रस्ताव असल्याने रस्त्यावर होणारी वाहनांची गर्दी थांबण्याबरोबरच नगरपालिकेच्या उत्पन्नामध्येही मोठी भर पडणार आहे.  मंत्रालयात या प्रस्तावावर बैठक होणार असल्याने नगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या तयारीचा आढावाही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी  नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्याकडून यावेळी घेतला.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.