जालना:अनेकांचा वंचित आघाडीत समावेश

0

जालना (प्रतिनिधी):- जालना शहरातील आनंद नगर, जय नगर,कन्हैया नगर,भाग्योदय नगर,येथील कार्यकर्त्यांनी बहुजन हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्ववावर विश्वास ठेवून, मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी मध्ये ख्रिश्चन समाजाचे युवा उद्योजक अमोल लोखंडे,प्रताप गायकवाड,सुनिल जोशवा, चर्मकार समाजाचे प्रकाश खरे, चोकाजी लहाने, जगदीश सोनवणे धोबी समाजाचे यांच्यासह सतीश बोराडे, महिला प्रतिनिधी चंद्रकला सोनवणे आदींनी प्रवेश केला.
यावेळी जिल्हानेते ऍड कैलास रत्नपारखी, विनोद दांडगे, युवा नेते सचिन कांबळे,शहराध्यक्ष कैलास रत्नपारखे, गौतम वाघमारे, शहर संघटक अर्जुन जाधव,किशोर जाधव, नितीन बालराज,पवन काकडे,सिद्धार्थ काळेबाग, अजय कांबळे,निखिल बोर्डे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.