जल व भूजल व्यवस्थापन वेबसिरीज च्या माध्यमातून भूजल सर्वेक्षणआणि विकास यंत्रणा जालना कार्यालयात तर्फ पाच दिवसीय चर्चासत्राचे आयोजन

0

जालना , दि. 31 मे  :पाण्याची मागणी लोकसंख्येच्या प्रमाणात दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. त्यामुळे केवळ देशातच नव्हे तर जगभरात पाणीटंचाईची तीव्रताहि त्याच वेगाने वाढत आहे. अशावेळी जमिनीखालील पाण्याला अर्थात भूजल व्यवस्थापनाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत यासाठी प्रयत्न सुरु असून त्याला लोकसहभागाची जोड आवश्यक असल्याचं मत   भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक,  डॉ चक्रधर चव्हाण यांनी व्यक्त केले. अटल भूजल योजनेत जिल्ह्यातील समाविष्ठ गावांना भूजल व्यवस्थापन या विषयावर ऑनलाईन वेबिनार/कार्यशाळेद्वारे माहिती देताना   त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ही स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला  ५० वर्ष पूर्ण होत असल्याने हे वर्ष भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे  सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे.  सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा तर्फे विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यातील अटल भूजल योजना अंतर्गत समाविष्ट गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम पाणीपुरवठा समिती सदस्य, तसेच गावातील पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याच्या संबंधित काम करणारे स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट सदस्य, यांना ऑनलाइन वेबिनार द्वारे जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक  भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयामार्फत ५ दिवसीय ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये  १) अटल भुजल योजना २)  जिल्ह्यातील भूशास्त्रीय स्थिती ३) पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ४) विहीर पुनर्भरण ५) पाण्याचा ताळेबंद इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आज दिनांक ३० रोजी घनसावंगी तालुक्यातील GP -३७A या पाणलोट क्षेत्रातील बेलवाडी, घोनसी तांडा, हातडी, कोठला, मासेगाव, साकळगाव या गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी यांना ऑनलाईन वेबिनार मध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेतील उपस्थितांना डॉ चव्हाण यांनी  अगदी सोप्या पद्धतीत भूजल, भूगर्भविज्ञान, शेतीतील अनेक पैलू समजावून सांगितले.  या ५ दिवसीय ऑनलाईन वेबिनारमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले   यावेळी ‘भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणे’चे कनिष्ठ भूवैज्ञानिक  श्री. डॉ कृष्णा देशपांडे, यांनी भूजल गुणवत्ता व सी एच गिरीधरा यांनी पाण्याचा ताळेबंद या विषयावर मार्गदर्शन केले तसेच घनसांगी तालुका कृषी अधिकारी श्री रोडगे व   श्री भीमराव मेश्राम उपसंचालक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा औरंगाबाद यांनी ही विविध विषयावर यावेळी मार्गदर्शन केले यावेळी अटल भुजल योजनेत समाविष्ट उपरोक्त गावातील सरपंच ग्रामसेवक स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी तसेच इतर मान्यवर ऑनलाइन सहभागी झाले होते

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.