केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या जाफ्राबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीर झाडाझडती करणारे पोलीस अधिकारी निलंबित

0

जालना: पोलीस अधिक्षक, जालना यांनी आज दि.१४/०६/२०२१ रोजी जाफ्राबाद पोलीस स्टेशन चे १) पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल २) पोलीस उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे ३) पोलीस हेड कॉन्सटेबल मंगलसिंग रायसिंग सोळंके ४) पोलीस कॉन्सटेबल सचिन उत्तमराव तिडके ५) शाबान जलाल तडवी यांनी दि.११/०६/२०२१ रोजी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नसताना अथवा कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता एका राजकीय पक्षाच्या जनसंपर्क कार्यालय जाफ्राबाद येथे प्रवेश करून कोणतेही कायदेशीर अधिकारी नसताना कार्यालयाचे झाडाझडती घेऊन शोध घेतला, यामुळे पोलीस खात्याची जनसामन्यात प्रतिमा मलीन होण्यास कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत कायद्याचे पूर्ण ज्ञान असताना देखील कर्तव्यात बेकायदेशीर व अत्यंत बेशिस्तपणाचे वर्तन केले म्हणून निलंबनाची कारवाई केली.

- Advertisement -

या बाबत अधिक माहिती अशी आहे की, दि. 11/06/2021 रोजी सायंकाळी 4.45 वाजेच्या सुमारास केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यालय प्रमुख श्री.उध्दव दुनगहू, श्री. नागेश धुपे व श्री. अंबादास जाधव हे कार्यालयात कार्यालयीन कामकाज करीत असतांना जाफ्राबाद पोलिस ठाण्यातील पोलिस उप निरिक्षक युवराज पोटरे, पोलिस उपनिरिक्षक नितीन काकरवाल, पोलिस कॉन्सटेबल शाबान तडवी, जाफ्राबादचे बीट जमादार मंगलसिंग सोळंके व पोलिस कॉन्सटेबल सचिन तिडके या 06 पोलिस कर्मचाऱ्यांनी कोणतेही कायदेशीर अधिकारी नसतांना ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिरून कार्यालयाची झाडाझडती घेत कार्यालयीन संचिका व इतर साहित्याची नासधुस केली तसेच त्यांतील काही संचिका व निवडणुक व मतदारसंघातील विविध विकास कामांचा डेटा जबरदस्तीने सोबत घेऊन गेले. सदर झाडाझडती करीत असतांना ना.दानवे यांचे कार्यालय प्रमुख श्री.उध्दव दुनगहू यांनी झाडाझडती घेण्यासाठी आपल्याकडे रितसर आदेश आहेत काय? अशी पोलिस उपनिरिक्षक युवराज पोटरे यांच्याकडे विचारणा केली त्यावेळी त्यांनी श्री.उध्दव दुनगहू यांना अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली व सुमारे 45 मिनिटे कार्यालयात हैदोस घातला.

सदर बेकायदेशीर झाडाझडती घेत असतांना त्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या संचिका व इतर साहित्याची नासधुस करुन त्यातील काही महत्वाच्या संचिका, लोकसभा निवडणुक व मतदारसंघातील विविध विकास कामांचा डेटा आणि जनेतेने दिलेली निवेदने कार्यालयीन कार्मचाऱ्यांच्या विरोधास न जुमानता सोबत नेली. एका संसदीय लोकप्रतिनिधी व विद्यमान केंद्रिय राज्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयाची कुठलेही कायद्देशीर आदेश न घेता झाडाझडती घेणे व ती घेत असतांना कार्यालयीन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करीत कार्यालयीन संचिका आणि इतर साहित्याची नासधुस करणे ही बाब संपूर्णतः बेकायदेशीर व संसदीय लोकशाहीला काळीमा फासणारी असल्याने सर्वसामान्य जनतेचा न्याय व्यवस्था व लोकशाहीवरील विश्वास उडाला असल्याचे व उक्त पोलिस कर्मचाऱ्यांनी कुठल्या कारणाने कोणतेही कायदेशीर आदेश न घेता ना.दानवे यांच्या जाफ्राबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची झडती घेतली? व ती घेत असतांना त्यातुन काय निष्पन्न झाले याचा पोलिस खात्याने तात्काळ खुलासा करावा अशी लेखी निवेदनाद्वारे तक्रार केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी पोलीस अधिक्षक, जालना यांच्याकडे केली. तक्रारीत त्यांनी पोलिसांनी कोणतेही कायदेशीर अधिकार नसतांना माझ्या जनसंपर्क कार्यालयाची झाडाझडती घेतल्यामुळे त्यांची बदनामी होत असल्याचे व पोलिसांनी ही झाडाझडती कारवाई त्यांची जनमाणसातील प्रतिमा मलिन करण्यासाठी हेतुपुरस्सररित्या केली असल्याचा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून जनतच्या मनातील संभ्रम दूर व्हावा म्हणुन आपण सदर प्रकरणाची चौकशी करुन उपरोक्त सर्व पोलिस कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी केली. या मागणीची तात्काळ दखल घेत पोलीस अधिक्षक, जालना यांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे जनसामान्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.